मुंबई : मागच्या महिन्याभरापूर्वी झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर आता परत एकदा राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी यासंदर्भातील वक्तव्य केलं असून लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं म्हटलं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारामध्ये कोणा कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह आज ‘हे’ मंत्री पुण्यात येणार, या कामाचं करणार उद्घाटन
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “राज्यामध्ये ४३ मंत्री असतात. त्यामध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसहीत शिवसेना-भाजपाचे प्रत्येकी ९ असे २० मंत्री सध्या मंत्रिमंडळात आहेत. आणि आता लवकरच इतर २३ मंत्र्यांचा समावेश होईल. महाराष्ट्रामध्ये २८८ मतदारसंघ आहेत. व ४३ मंत्री होतात. ४३ पैकी भाजपाचे आणि शिवसेनेचे प्रत्येकी ९ मंत्री असे २० मंत्री झालेले आहेत. मात्र भविष्यात २३ मंत्री होतील”.
Cotton: शेतकऱ्यांना बाप्पा पावला ; धरणगावच्या जिनिंगमध्ये कापसाला मिळाला उच्चांकी 11,153 रु.चा भाव
सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकाही महिलेचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे सरकारवर विरोधाची जोरदार टीका झाली होती. त्यावेळी पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महिलांना संधी देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिले होते. त्यामुळे आता मंत्रिमंडळाच्या विस्तारात कोणत्या महिला नेत्यांना संधी मिळणार. याकडे सर्वांचे लक्ष्य लागणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर तब्बल एका महिन्याने राज्याच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार करण्यात आला. त्यामध्ये देखील अधिवेशनाच्या तोंडावर फक्त 18 मंत्र्यांना त्यावेळी शपथ देण्यात आली.यामुळे काही महत्त्वाच्या नेत्यांना संधी न मिळाल्याने ते नेते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता ही नाराजी दूर करण्यासाठी लकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल, अशी जोरदार चर्चा चालू आहे.