Baramati Lok Sabha । अजितदादांची धक्कादायक बातमी; शिंदे गटानेही दर्शवला बारामतीत विरोध

Baramati Lok Sabha

Baramati Lok Sabha । यंदाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) बालेकिल्ल्यातच मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. पक्षात बंड केल्याने अजितदादांना घरातूनच विरोध होत आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार (Supriya Sule Vs Sunetra Pawar) असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. अशातच शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी देखील याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आता अजितदादांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Latest marathi news)

Topers Ad

Sanjay Raut । बिग ब्रेकिंग! प्रकाश आंबेडकरांसोबत युती संपुष्टात? संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानाने खळबळ

खडकवासला विधानसभा मतदार संघातील शिवसेनेला विचारात घेत नसल्याने शिवसैनिक नाराज असून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत या मतदार संघात एक मेसेज फिरत आहे. ‘बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचार करायचा नाही. पुणे लोकसभेतील मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांचा प्रचार करू या,’ असा मेसेज शिवसेनेच्या एका व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल झाला आहे.

Praniti Shinde | राजकारणातून सर्वात मोठी बातमी! प्रणिती शिंदेंचं थेट राम सातपुतेंना पत्र

अशातच आता हा मेसेज पाठवणारे पदाधिकारी कोण याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या मेसेजमुळे अजितदादांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता अजित पवारांना कुटुंबातून विरोध होत असताना महायुतीचे पक्ष सोबत नसल्याचे चित्र समोर आले आहे. अजित पवार आता कोणती भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Raju Parve Resign । काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर राजू पारवे यांचा गंभीर आरोप, म्हणाले…

Spread the love