राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. मागच्या काही दिवसापूर्वी बारामतीमधील (Baramati) अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. यामध्येच आता अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या भावाने देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे.
सोनिया गांधी राजकारणातून निवृत्ती घेणार? काँग्रेसच्या अधिवेशनात केली मोठी घोषणा
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या (Underworld don Arun Gawli) भावाने देखील शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात याच्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची ताकद वाढली अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
धक्कादायक! पुण्यात ससून रुग्णालयामध्ये दोन गटांत कोयत्याने हाणामारी
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचा भाऊ प्रदिप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी यांनी वर्षा निवासस्थानी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर मुंबईच्या भायखळ्यातील दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्त्यांनी देखील शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे.
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया!
याबाबत माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत माहिती दिली आहे. फोटो शेअर करत त्यांनी म्हंटले आहे की, “मुंबईतील भायखळा परिसरातील माजी नगरसेविका वंदना गवळी आणि प्रदीप गवळी यांच्यासह अखिल भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.”
महाराष्ट्रात सत्तांतर करण्यासाठी सुमारे 2 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
मुंबईतील भायखळा परिसरातील माजी नगरसेविका वंदना गवळी आणि प्रदीप गवळी यांच्यासह अखिल भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/4m0fLZRBX4
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 25, 2023