शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना ह्रदयविकाराचा झटका, मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

Shinde group MLA Sanjay Shirsath suffered a heart attack and is undergoing treatment at Mumbai's Lilavati Hospital

मुंबई: शिंदे गटातील (shinde group) औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाठ (MLA Sanjay Shirsath) यांना ह्रदयविकाराचा (heart attack) झटका आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईकडे रवाना करण्यात आले आहे. सोमवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर औरंगाबादमधील (Aurangabad) सिग्मा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांना उपचारासाठी मुंबईकडे (Mumbai) रवाना करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आयएएस अधिकाऱ्याने 21 वर्षीय महिलेला नोकरीचे आश्वासन देत केले ‘हे’ कृत्य

मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जातील अशी माहिती देखील समोर आली आहे. शिरसाठ यांना काल दुपारी प्रकृती अवस्थ वाटल्याने औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने आज सकाळी तातडीने उपचारांसाठी मुंबईला आणण्यात आले आहे. औरंगाबाद विमानतळावर संजय शिरसाट यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

‘सैराट’मधील लंगड्या आणि सल्या दिसणार ‘या’ चित्रपाटाच्या मुख्य भूमिकेत

संजय शिरसाट यांची 1985 मध्ये शिवसेनेचे शहर संघटक म्हणून नियुक्ती झाली होती. राज्यात 1995 मध्ये युतीची सत्ता आल्यानंतर मराठवाडा औद्योगिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी त्यांची निवड करण्यात आली होती. शिरसाट हे 2000 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2009 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले. त्यानंतर सलग तीन वेळेस शिरसाट यांनी विजय संपादन केला.

दूध खरेदी दरामध्ये वाढ! ‘या’ दूध संघाने दिली दूध उत्पादकांना दिवाळी भेट

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *