मुंबई : एकनाथ शिंदेनी भाजपसोबत युती करून राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन केले. यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले. दरम्यान शिंदे गट आणि ठाकरे गट यामध्ये शिवसेना नेकमी कुणाची? यावरून चांगलेच वादविवाद चालू होते. याप्रकरणी काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. पण या सुनावणीमध्ये ठाकरे गटाची याचिका फेटाळण्यात आली व एकनाथ शिंदे यांच्या कडून निकाल लागला. आता यावर अनेक राजकीय नेते आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. यामध्येच आता विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी एक विधान केले आहे.
पीएफआय विरोधात केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय; पुढच्या पाच वर्षांसाठी…
अंबादास दानवे म्हणाले, न्यायालयाच्या निकालावर शिंदे गट आनंदी आहे. पण शिंदे गटाचा जल्लोष तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. खरं यश शिवसेनेला मिळेल, असं म्हणत दानवेंनी शिंदे गटाला टोला लगावलाय. अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. आम्हाला न्याय नक्कीच मिळणार असा विश्वासही अंबादास दानवेंनी व्यक्त केलाय.
Cotton: यंदा कापसाला उच्चांकी बाजारभाव मिळणार का? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय बाजारभाव
पुढे बोलताना ते म्हणाले, “खरी शिवसेना ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विचारांचीच आहे. शिंदे गटातील आमदारांना निवडणुकीसाठी अर्ज देखील उद्धव ठाकरेंच्याच आदेशाने देण्यात आला होता”.