महाविकास आघाडीवर टीका करताना शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली; म्हणाले, “शरद पवार म्हणजे अंगठा…”

Shinde MLA's tongue slips while criticizing Mahavikas Aghadi; Said, "Sharad Pawar is a thumb..."

राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक पहायला मिळत आहे. शिवसेना( Shivsena) शिंदे गटाचे (Shinde Group) कोरेगावचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी अतिशय खालच्या भाषेत टीका केली आहे.

हातानेच गुंडाळला डांबरी रस्ता, व्हीडिओ पाहुन तुम्हीही व्हाल थक्क

महेश शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणजे वज्रमूठ नाही. तर वज्रमूत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे हाताचं ठेंगा आहेत. तर संजय राऊत म्हणजे करंगळी आहेत. आपण त्या बोटाचे संकेत कधी देतो तुम्हाला तर माहितीच आहे, असे ते म्हणाले.

शेजाऱ्याने केलेला अपमान जिव्हारी लागला, 70 वर्षीय आजोबांनी स्वतःच आयुष्य संपवलं

तसेच, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मधले बोट आहेत. त्यांच्या शेजारील २ बोटे म्हणजे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. सातार्‍यातील शिवतीर्थ पोवई नाक्यावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान महेश शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मात्र, त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लग्नात घडला भयानक प्रकार, वऱ्हाडी थेट नवरीला घेऊनच पळाले; घटना वाचून बसेल धक्का

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *