गौतमी पाटील सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत. मागच्या काही दिवसापूर्वी नृत्य करताना अश्लील हावभाव केल्यामुळे गौतमी अडचणीत सापडली होती. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील याबद्दल नाराजी व्यक्त केल्यामुळे गौतमीने जाहीरपणे माफी मागितली होती. नृत्यात बदल करेल असं ती म्हणाली होती. यानंतर गौतमीच्या लोकप्रियतेने उच्चांक गाठला. प्रत्येक गावात तिचे कार्यक्रम हाउसफुल ठरत आहेत. नुकतीच गौतमीची एक मुलाखत झाली आणि त्यामध्ये तिने एकनाथ शिंदे की ठाकरे या प्रश्नाचे अगदी गमतीशीर उत्तर दिले.
मोठी बातमी! दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याच्या निर्णयावर शरद पवार यांचे थेट केंद्रीय मंत्र्यांना पत्र
गौतमी पाटील ची’दॅट ऑड इंजिनिअर’ युट्यूब चॅनलने मुलाखत घेतली. यामध्ये गौतमी पाटील ला खूप प्रश्न विचारण्यात आले. तिचं बालपण तिचं शिक्षण तिच्या आवडी निवडी, लग्न बंधनात कधी अडकणार, अशा अनेक प्रश्न तिला विचारण्यात आले आणि तिने या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी मजेशीर दिली. तर काही रॅपिड फायर प्रश्न विचारले ज्यामुळे तिची थोडी धांदल उडाली.
ब्रेकिंग! रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी समोर आली मोठी अपडेट
रॅपिड फायर मधला एक प्रश्न असा होता की ‘एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे या दोघांपैकी एकाची निवड करायची होती. या प्रश्नाचं उत्तर देताना मात्र तिची थोडी धांदल उडाली आणि तिने उत्तर देणे टाळलं. गौतमी हसतच म्हणाली. ‘तू मला मार खायला लावशील किंवा मी तुला मारेल’ तिनं असं म्हणताच हशाच वातावरण निर्माण झालं.
राज्यामध्ये गारपिटसह वादळी पावसाचा इशारा,’या’ जिल्ह्यांना मोठी चिंता!