Dasara Melava । मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निर्णयामुळे शिवसेनेमध्ये (Shivsena) दोन गट पडले आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ठाकरे आणि शिंदे गट सतत आमनेसामने येतात. आताही हे दोन दसरा मेळाव्यावरून आमनेसामने आले आहेत. मागील वर्षी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. यावर्षी महिनाभरापूर्वी दोन्ही गटाकडून महापालिका प्रशासनाकडे अर्ज केला आहे. (Latest Marathi News)
Export Business । ‘या’ सोप्या पद्धतीने विका परदेशात शेतमाल, परवाना कसा काढावा? जाणून घ्या
महापालिका प्रशासन कोणाच्या बाजूने निर्णय देणार? आणि शिवाजी पार्कवर (Shivaji Park) कोणाचा आवाज घुमणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आता याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने विधी विभागाकडून अभिप्राय मागितला आहे, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, मागील वर्षी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली होती. (Shivsensa Dasara Melava)
Maratha Reservation । मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात! करणार ‘या’ जिल्ह्यांचा दौरा
शिवसेना दादर येथे छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर स्थापनेपासून दसरा मेळावा घेते. परंतु शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याने शिवाजी पार्कवर कोणत्या गटाने दसरा मेळावा घ्यावा? असा पेच महापालिकेसमोर निर्माण झाला आहे, पालिकेने अजूनही कोणत्या गटाला मेळाव्याची परवानगी दिली नाही. परंतु बाळासाहेबांचे विचार आमच्याकडे असल्याने अनेकजण आमच्याकडे येत आहेत. त्यासाठी एकनाथ शिंदे यांना सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे, असे शिंदे गटाचे प्रवक्ते, माजी महापौर नरेश म्हस्के म्हणाले.