Shiv Sena MLA Disqualification। सध्या शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडून वाचन सुरु आहे. मागील दिड वर्षापासून हा सत्तासंघर्ष सुरु आहे. यावेळी सभागृहात दोन्ही गटाचे सदस्य उपस्थित आहेत. नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाचे आणि दोन्ही गटाच्या वकिलांचे आभार मानले. निकालाच्या सुरुवातीलाच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news)
राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाजूने खूप मोठा निकाल दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमत असून त्यांचा पक्षच हा मूळ शिवसेना पक्ष आहे, उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा झटका मानला जात आहे. राहुल नार्वेकरांच्या या निकालानंतर ठाकरे गटाची पुन्हा कायदेशीर लढाई सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ठाकरेंना एकनाथ शिंदेंना पक्षातुन काढण्याचा अधिकार नाही. राष्ट्रीय कार्यकरणीसोबत चर्चा करुनच पक्षातून हकालपट्टीचा निर्णय घेता येतो. पक्षात बंड झाल्यानंतर पक्षप्रमुख या नात्यानं नेता आपला आदेश पक्षाचा आदेश म्हणून वापरता येईल, पण जर पक्षातील इतर नेत्यांनी घटनेच्या आधारे नवीन नेता पक्षप्रमुख म्हणून निवडला असल्यास त्याचाच दावा घटनेनुसार अधिकृत मानावा लागणार आहे.
Maratha Reservation । अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात मराठा समाज आक्रमक, दिला मोठा इशारा
ठाकरे गटाचं प्रतित्रज्ञापत्र अमान्य
दरम्यान, 2018 ची पक्षाची घटना ग्राह्य धरली जाणार नाही, कारण निवडणूक आयोगाकडे याची कोणतीही नोंद नाही. केवळ 1999 ची घटना ग्राह्य धरली जाईल. निवडणूक आयोगाच्या नोंदीमध्ये शिंदे गट ही खरी शिवसेना असून निवडणूक आयोगानं दिलेली घटनेची प्रत वैध आहे. 2023 मध्ये निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या घटनेची प्रत मिळाली. ठाकरे उलटतपासणीला आले नाहीत, म्हणून ठाकरे गटाचं प्रतित्रज्ञापत्र अमान्य आहे, असे स्पष्टीकरण नार्वेकरांनी दिले आहे.
Yash Fan Death । ‘केजीएफ’ स्टार यशच्या आणखी एका चाहत्याचा मृत्यू, भेटायला येताना घडली दुर्दैवी घटना