सध्या रब्बी हंगामातील (Rabi season) पिकांना पाणी देण्याचे काम सुरु आहे. महावितरण कंपनी (Maha distribution company) शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्रीचा वीजपुरवठा करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभरही शेतीतच राबावे लागत आहे. दिवसभर शेतीत वीजपुरवठा नसल्याने शेतकऱ्यांना रात्रीची शेतीत राबण्याची वेळ आली आहे.
यामुळे शेतकरी मुख्यमंत्र्यांना सोशल मीडियावर (Social media) भावनिक साद घालणारे मेसेज देखील पाठवत आहेत, ‘मुख्यमंत्रीसाहेब, शेतीला किमान दिवसा लाइट द्या हो!’ असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सरकारला लाज वाटली पाहीजे, राजू शेट्टींची बोचरी टीका
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून (Maharashtra State Electricity Distribution Company) शेतीला वीजपुरवठा (Electricity) करण्यासाठी वेळापत्रसक बनविले जाते. त्यावेळापत्रकानुसार शेतीला वीज उपलब्ध होते. सध्याच्या वेळापत्रकानुसार रात्री दहा नंतर वीजपुरवठा सुरु होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतात पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर शेतातच राबावे लागत आहे. त्यामध्ये हि रोहित्रावर काही बिघाड झाल्यास शेतकऱ्यांनाच नीट करावा लागत आहे. त्यामुळे महावितरणच्या कारभाराला आणि दररोज रात्रीच्या जागरणाला शेतकरी कंटाळल्यामुळे मुख्यमंत्र्यांना भावनिक मेसेज पाठवले जात आहेत.