मागच्या वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे राजकीय भूकंप आला होता. यावेळी त्यांनी मूळ शिवसेनेला खिंडार पाडून राज्यात शिंदे- फडणवीस ( Shinde – Fadanvis) सरकार स्थापन केले. यामध्ये सगळ्यात मोठा हादरा शिवसेनेला बसला. यानंतर शिवसेनेचे ठाकरे व शिंदे असे दोन गट पडले. या दोन्ही गटात तेव्हापासून वाद सुरू आहेत जे आजपर्यंत अगदी विकोपाला गेले आहेत. यामुळे हे दोन्ही गट एकत्र येतील अशी शंका देखील कुणी घेणार नाही. अशातच शिंदे गटातील नेते व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अगामी काळात एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) व उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) एकसंघ होऊ शकतात. असा गौप्यस्फोट केला आहे.
मोठी बातमी! सोलापूरमधल्या बार्शीत फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट
शिर्डी येथील एका कार्यक्रमात बोलताना दीपक केसरकर यांनी शिंदे व ठाकरे एकत्र येण्याची शक्यता बोलून दाखवली आहे. दरम्यान, यासाठी त्यांनी एक अट सुद्धा ठेवली आहे. यावेळी ते म्हणाले की ” शिवसनेतील लोक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे लोक आहेत. आणि त्यांच्या विचारांवर चालणारे लोकं सहजासहजी साथ सोडत नाहीत. शिवसेनेतील लोक शिंदे गटाला जाऊन मिळाले, याचा अर्थ निश्चितपणे काहीतरी असे घडले आहे, ज्यामुळे लोक नाराज होऊन शिवसेनेतून बाहेर पडले आहेत.
मोठी बातमी! केशवराव धोंडगे यांचं निधन; वयाच्या १०२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दरम्यान यामध्ये नेमकी कोणती गोष्ट घडली याचे आत्मपरिक्षण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करावे. त्यांनी स्वतःहून आत्मपरिक्षण केले तर शिंदे आणि ठाकरे एकत्र येऊन शिवसेना पुन्हा एकदा एकसंध व्हायला वेळ लागणार नाही. असे केसरकर म्हणाले आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आपल्याला आदर असल्याचे देखील केसरकर यांनी बोलून दाखवले आहे. शिंदे व ठाकरे गट यांच्यातील कटूता कमी करणे उद्धव ठाकरेंच्या हातात असून मी त्यांचा आदर ठेवणारा मनुष्य आहे. असे मत यावेळी केसरकरांनी मांडले आहे.
जिंदाल कंपनीच्या आगीत ११ जण जखमी, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती