
एकनाथ शिंदे यांच्या राजकिय बंडानंतर धनुष्यबाण व शिवसेना कुणाची ? यावरून शिंदे व ठाकरे गटात चढाओढ सुरू होती. दरम्यान काल निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह आणि नाव शिंदे गटाला दिले आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचे नाव परत मिळू शकते का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
बिग ब्रेकिंग! पुण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा
या पार्श्वभूमीवर जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, निवडणूक आयोगाचा निकाल कायम असतो. मात्र उद्धव ठाकरेंनी सुप्रिम कोर्टात दाद मागितली आणि तिथे न्याय मिळाला तर कदाचित त्यांना चिन्ह आणि नाव परत मिळू शकते. एखाद्या पक्षाबाबत निवडणूक आयोगाने निकाल दिला तर तो अंतिम असतो. मात्र अपवादात्मक प्रकरणात सुप्रीम कोर्ट निर्णय बदलू शकते. उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांना दाद मागता येऊ शकते.
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना आव्हान; म्हणाले, “मर्द असाल तर…”
उद्धव ठाकरे शिवसेना ( Shivsena) पक्ष व धनुष्यबाण परत मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रिम कोर्टात गेले तर, त्यांना त्यांचा शिवसेनेवर कसा अधिकार आहे. हे पटवून द्यावे लागणार आहे. तसेच यामध्ये आणखी एक शक्यता आहे. ती म्हणजे, जर १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात ठाकरे गटाच्या बाजूने निकाल लागला तर आयोगाच्या निर्णायवर विचार केला जाऊ शकतो. अशी माहिती देखील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाने शिंदे गटाला झालेला आनंद फार काळ टिकेल का ? हे सांगता येणार नाही.