शिर्डी येथील साईबाबा संस्थान हे अनेक मोठ्या संस्थानांपैकी एक आहे. येथे नुकतेच काही नवीन निर्णय घेण्यात आले आहेत. यानुसार भाविकांना साईबाबा समाधीला हात लावून दर्शन घेता येणार आहे. यामुळे साईभक्त आनंदांत असल्याचे पहायला मिळत आहे.
बुधवारी (दि.9) साईबाबा संस्थानाची (Saibaba Trust, Shirdi) एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी काही निर्णय घेतले आहेत. शिर्डीच्या ग्रामस्थांनी मध्यंतरी बानायत यांची भेट घेऊन काही मागण्या केल्या होत्या. या मागण्या यावेळी पूर्ण करण्यात आल्या. बैठकीत पूर्ण करण्यात आलेल्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत.
काय सांगता! घरात मांजर पाळायचे तर पालिकेची परवानगी घ्यावी लागणार
1) साईबाबांच्या समाधीपुढील काच काढून दर्शन घेऊ देणे.
2) जेव्हा गर्दी असते तेव्हा कमी उंचीची काच लावणे.
3) द्वारकामाई मंदिरात आतील बाजूस भाविकांना प्रवेश देणे.
4) साईबाबांची आरती सुरू असताना मंदिराची परिक्रमा करू देणे.
5) ग्रामस्थांसाठी मंदिर परिसर प्रवेशद्वारावर येण्या-जाण्यासाठी मार्ग मोकळा करणे.
6) मंदिर परिसरात लावण्यात आलेले अधिकचे बॅरिकेड काढून टाकणे.
7) श्री साईसच्चरित लवकरात लवकर उपलब्ध करून देणे.
चक्क बकरीच्या पिल्लाचा केला वाढदिवस साजरा ! इतकेच नाही तर, डीजे लावून फोटोसुद्धा काढले…
याशिवाय उर्वरित मागण्या टप्प्याटप्प्याने मान्य करण्यात येतील अशी माहिती साईबाबा संस्थानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत (Bhagyashree Banayat) यांनी दिली आहे.
IND vs ENG: रोहित शर्मा ढसाढसा रडत होता ‘या’ व्यक्तीने काढली समजूत, यालाच तर म्हणतात टीम इंडिया