Shirish Maharaj More | सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संत तुकारामांचे ११ वे वंशज, प्रसिद्ध व्याख्याते ह.भ.प. शिरीष महाराज मोरे (H.B.P. Shirish Maharaj More) यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे. ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी अत्यंत टोकाचे पाऊल उचलले यामुळे देहू गावावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
Shrihari Kale | सर्वात मोठी बातमी! शरद पवार गटाच्या नेत्याचा अपघाती मृत्यू
माहितीनुसार, आज (शुक्रवार, 9 फेब्रुवारी) सकाळी राहत्या घरी शिरीष महाराज मोरे यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. आज संध्याकाळी 4 वाजता देहू गावातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Delhi Legislative Assembly । दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५; सकाळपासून मतदानाला सुरवात
शिरीष महाराज मोरे हे लवकरच विवाहबद्ध होणार होते. मात्र त्यांच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.