मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी जैनकवाडी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये पारंपारिक पद्धतीने महाराजांची पालखी काढून प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तसेच सावित्रीबाई फुले यांच्या देखील प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दिली धक्कदायक माहिती
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार दिंडीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले. तसेच महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ज्ञानेश्वर जगताप यांनी केले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ग्राम संघाच्या अध्यक्षा ललिता सूर्यवंशी यांनी केले. त्याचबरोबर विश्वजीत पवार यांनी महाराजांच्या गुणांचे अनुकरण केले पाहिजे असे मत यावेळी व्यक्त केले.
मोठी बातमी! OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचे निधन
होम मिनिस्टर या कार्यक्रमासाठी महिलांना सहभागी होण्यासाठी सुरेश हिटे सरांनी मार्गदर्शन केले. व होम मिनिस्टर हा कार्यक्रम ज्ञानेश्वर जगताप यांनी घेतला. या कार्यक्रमामध्ये महिलांनी देखील उत्स्फूर्तरित्या सहभाग घेतला होता. विजेत्या महिलांना पारितोषिक देखील देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन स्वप्निल पवार , कल्याण ननवरे व प्रशांत माने यांनी केले. कार्यक्रमांमध्ये अन्नदान करण्याचे काम गावचे सरपंच संदीप शेंडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर सूर्यवंशी व विजय माने यांनी केले.
मुंबई लोकल ट्रेनमध्ये कपलचा रोमान्स पाहून लोकंही हैराण, घटना कॅमेऱ्यात कैद; पाहा VIDEO
(प्रतिनिधी – जागृती माने)