राज्यपाल भगतसिंग कोश्यारी लवकरच पदमुक्त होणार असल्याच्या चर्चा राज्यात सुरू आहेत. दरम्यान त्यांना कोल्हापूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. येत्या 16 फेब्रुवारीला कोल्हापूर विद्यापीठात हा सोहळा होणार आहे. मात्र राज्यपालांच्या या दौऱ्याला शिवसेनेकडून विरोध करण्यात आला आहे.
राज्यपालांच्या दौऱ्याला निषेध म्हणून शनिवारी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या ( Shivaji University) प्रवेशद्वारात हे आंदोलन होणार आहे. कोल्हापूरमध्ये येण्याआधी भगतसिंग कोश्यारी यांनी जाहीर माफी मागावी. असे न झाल्यास दीक्षांत समारंभास्थळी निदर्शन करण्यात येईल. असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे.
“मी तुम्हाला करते मुजरा”, गौतमी पाटीलच नवीन गाणं रिलीज होताच नेटकऱ्यांनी घेतलं डोक्यावर!
कोल्हापुरात शिवरायांच्या नावाने असलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला भगतसिंग कोश्यारी यांना निमंत्रित करून विद्यापीठ प्रशासनाने कोल्हापूरच्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे. ही गोष्ट जनता कदापी सहन करणार नाही. यामुळे कोल्हापुरात येण्यापूर्वी राज्यपालांनी माफी मागावी. त्यांच्या विरोधातील आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून शनिवारी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. असे शिवसेनेचे (Shivsena) जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांना सांगितले आहे. याबाबत विद्यापीठाकडे देखील निवेदन देण्यात आले आहे.
सिद्धार्थ-कियाराच्या लग्नात झाला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा खर्च; वाचून डोळे फिरतील