यंदाच्या हिवाळी अधिवेशनात शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून शिवसेना आमदार आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर भाजप व शिंदे गटातील नेत्यांकडून दिशा सालीयन प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीला दिशा सालीयन प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी राहुल शेवाळे ( Rahul Shewale) यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. त्यांच्यासाठी देखील चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
खूण करून तरुण फरार; परंतु पोलिसांनी शेवटी हिसका दाखवलाच!
या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन राहुल शेवाळे यांनी बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेचे अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याचा आरोप केला आहे. यावरून शिवसेनचे मुखपत्र समजल्या जाणाऱ्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने शिंदे- फडणवीस सरकारला सूचक इशारा दिला आहे. यामध्ये राहुल शेवाळे सध्या कबुतरबाजी मध्ये अडकले असून याला दाऊद व पाकिस्तानचा अँगल आला आहे. असे सांगण्यात आले आहे.
रानूला मिळाला कानू! सोशल मीडियावर राणू मंडलचा ‘या’ मुलासोबतचा व्हिडीओ होतोय व्हायरल
तसेच बलात्काराच्या या प्रकरणात राहुल शेवाळे यांच्यासोबत इतर खासदारांची देखील नावे येऊ शकतात. पीडित महिला तपास यंत्रणेच्या चौकशीत अन्य धक्कादायक खुलासे करण्याची शक्यता आहे. हे खुलासे झाले तर शिंदे- फडणवीस ( Shinde- Fadanvis) सरकारच्या खुर्चीखाली बॉम्ब फुटेलच फुटेल. असा सूचक इशारा शिवसेनेकडून शिंदे- फडणवीस सरकारला देण्यात आला आहे. याशिवाय महाराष्ट्रातील सध्याचे सरकार अनैतिकतेच्या कुबडय़ांवर उभे आहेच, पण ते व्यभिचार व देशद्रोहय़ांच्या पायावरही टिकले आहे. अशी टीका सुद्धा शिवसेनेने शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.
आजच ही दोन कामे करून टाका! अन्यथा पीएम किसान योजनेचा 13 व्या हप्ता मिळणार नाही