मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवतिर्थावर दसरा मेळावा (Dasara Melava) शिवसेना घेणार की शिंदे गट (shinde group) याबाबत वाद सुरू होता. दरम्यान हा वाद कोर्टात (high court) देखील पोहचला होता. दरम्यान या वादासंदर्भात आज कोर्टात सुनावणी झाली असून दसरा मेळाव्याबाबत हायकोर्टाने अंतिम निर्णय दिला आहे. शिवाजी पार्कवर(shivaji park) दसरा मेळावा शिवसेनेने (shivsena) घ्यावा असा निर्णय देण्यात आला आहे. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याची हमी ठाकरेंच्या वकिलांनी न्यायालयात दिली.
खरतर दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी शिंदे गटाने आणि शिवसेनेने हायकोर्टाचे दार ठोठावले होते. मात्र दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायलयाने शिंदे गटाची याचिका फेटाळून लावली आहे. हा अर्ज फेटाळून लावताना ठाकरे गटाने हस्तक्षेप अर्जावर केलेल्या युक्तिवादाशी आम्ही सहमत असल्याचंही कोर्टाने म्हटलं. त्यामुळे शिवाजी पार्कवर शिंदे गटाला दसरा मेळावा घेता येणार नाहीये.
तसेच दोन ते सहा ऑक्टोबरपर्यंत शिवसेनेला शिवाजीपार्क वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच पोलिसांना संपूर्ण घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे स्वातंत्र्य आहे. तसेच याचिकाकर्ते कोणत्याही घटनेला जबाबदार असल्याचे आढळल्यास भविष्यात शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी नाकारण्याचे कारण ठरू शकते. तसेच पालिकेने आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे