मुंबई : मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोट (mumbai bombsfot) मालिकेतील दोषी दहशतवादी याकूब मेमनच्या(yakub meman) कबरीचे उद्दातीकारण या प्रकरणामुळे सध्या महाराष्ट्रातल वातावरण तापले आहे. दरम्यान विरोधकांकडून उद्धव ठाकरे यांच्या काळात याकूबच्या कबरीचे मझारमध्ये रुपांतर झाले.
Ambadas Danve: याकूब मेमनच्या कबरीचे उद्दातीकरण हे खूपच दुर्दैवी, अंबादास दानवेंनी दिली प्रतिक्रिया
हेच आहे का उद्धव ठाकरेंचे मुंबईवरील प्रेम आणि देशभक्ती? अशा टीका करण्यात आल्या. यावर शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी याकूब मेमनच्या (Yakub Memon) कबरीच्या उद्दातीकरणात शिवसेनेचा काडीमात्र संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Amit Shaha: मुंबईत दौऱ्यावेळी अमित शहांच्या सुरक्षेत ‘ही’ मोठी चूक, धक्कादायक कारण आल समोर
पुढे किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, याकूब मेमनच्या कबरीचे उद्दातीकारण करणे हा तिथल्या ट्रस्टचा निर्णय आहे कारण कब्रस्तानची जागाही या ट्रस्टची आहे. आणि मूळ म्हणजे ती ट्रस्ट खासगी आहे. खरतर आशिष शेलार (Aashish Shelar) यांना 2017 मध्ये ही मुंबईची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी त्यांना अपयश आले.त्यामुळे आता हा मुद्दा उकरून काढत ते आता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत.आशिष शेलार बावचाळले आहेत.ते काहीही टीका करत असल्याचा आरोप पेडणेकर यांनी केला.