
राज्यात सध्या शेतकऱ्यांच्या (Farmer) प्रश्नावरून सरकारला धारेवर धरले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आज शिवसेनेकडून यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
मोठी बातमी! आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर पाठलाग करून हल्ला!
सध्या शेतकऱ्यांच्या कापसाला (Cotton) आणि सोयाबीनला (soybeans) व्यवस्थित दर नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी भाव वाढतील या आशेने कापूस साठवणूक करून ठेवला आहे. मात्र अजून देखील भाव वाढलेला नाही. आता याच पार्शवभूमीवर शिवसेना आक्रमक झाली असून आज दुपारी 12 वाजता हिंगोली जिल्ह्यात हे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
अभिनेत्री अमृता खानविलकरनं नवऱ्याला सोशल मीडियावर केलं ब्लॉक; जाणून घ्या कारण
कापसाला प्रति क्विंटल 10 हजार रुपयांचा हमी भाव जाहीर करावा व लवकर खरेदी सुरु करावी, सोयाबीनला प्रति क्विंटल 7 हजार रुपयांचा रुपये हमी भाव जाहीर करावा, हरभरा आणि तुरीची नाफेडमार्फत ऑनलाईन नोंदणी सुरु करून लवकरात लवकर खरेदी सुरु करावी. या प्रमुख मागण्या असणार आहेत.
अरुंधतीच्या लग्नात पुन्हा नव विघ्न येणार; आप्पांनी दिला ‘हा’ इशारा