शिंदे-फडणवीस सरकारचा आयोध्या दौरा मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दौऱ्यासाठी अयोध्येत गेले असून यावेळी त्यांनी प्रभु श्री रामाचे दर्शन घेत, राम मंदिराच्या कामाची पाहणी केली. या आयोध्या ( Aayodhya) दौऱ्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान ठाकरे गटाने ( Thackeray Group) देखील शिंदे-फडणवीस सरकारला आयोध्या दौऱ्यावरून चांगलेच सुनावले आहे.
मारुतीची ‘ही’ हॅचबॅक कार ठरतीये लोकांची विशेष पसंती; जाणून घ्या काय आहेत फिचर्स
अयोध्येला एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात काही आमदार आणि खासदार गेले नव्हते. यावरून ते नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. यामध्येच शिंदेंच्या आमदारांचा एक मोठा गट नाराज आहे. काहीतरी गडबड आहे, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. आता याबाबत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना प्रश्न विचारला असताना त्यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे.
पुणे लोकसभा पोटनिवडणूकीसाठी रवींद्र धंगेकर मैदानात उतरणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अब्दुल सत्तार म्हणाले,” राऊत ठाकरे गटात राहतील का नाही यामध्येच मला शंका आहे. त्याचबरोबर संजय राऊत शिंदे गटात येण्यासाठी मार्ग शोधत असल्याचं अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले आहेत. त्यांच्या वक्तव्याने सगळीकडे खळबळ उडाली असून त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
गौतमीने स्पष्टच सांगीतलं तिला कसा नवरा पाहीजे; म्हणाली, “पैसे बंगला…”