Sanjay Raut । मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहेत. वेगवगेळ्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष सतत आमनेसामने आल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे एका मुलाखती दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे नाव घेताच माईकसमोर थुंकले होते. (Latest Marathi News)
त्यावरून आता त्यांच्यावर संजय शिरसाट यांनी कडवी टीका केली आहे. “संजय राऊत यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही. तो थुंकला म्हणून आपण थुकूंन चालणार नाही. पिसाळंलेलं कुत्र चावलं म्हणून त्याला चावायला जात नाही. जर आपण तसे केले म्हणजे आपणही त्याच लायकीचे आहे, अशी टीका शिरसाट यांनी केली आहे. त्यांच्या या टीकेला संजय राऊत कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
तसेच त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या खासदारकीवरही वक्तव्य केले. ” सुप्रीम कोर्टाने याची गंभीर दखल घेत राहुल गांधींना यापुढे अशी वक्तव्य करू नये असे सांगितले आहे. त्यांची खासदारकी परत मिळाली आहे, त्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला तर त्यात गैर काहीच नाही. त्यांच्या पक्षाचा नेता आहे त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे,” असे स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिले आहे.