Shiv sena Mla Disqualification । राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेना आमदार अपात्रतेबाबत निकाल जाहीर केला होता. यामध्ये राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला होता. यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आणि ठाकरे गटाने त्यांच्या निकोलाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडली आहे. सुप्रीम कोर्टाने आज ठाकरे गटाच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली आहे. सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या सर्व ४० आमदारांना नोटीस जारी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
PM Modi Speech । नरेंद्र मोदी यांनी मागितली प्रभू श्री रामांची माफी; भावुक होत म्हणाले…
सर्व आमदारांना सुप्रीम कोर्टाने आपलं म्हणणं सादर करण्याची नोटीस जारी केली आहे. सुप्रीम कोर्ट त्यांची बाजू ऐकून घेणार त्यानंतर हे प्रकरण हाय कोर्टात पाठवावे किंवा हायकोर्टातील प्रकरण सुप्रीम कोर्टात घ्यावे यावर निर्णय होणार आहे. शिंदे गटाच्या आमदारांना सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्यांची मुदत दिली असून यामध्ये आमदारांना आपलं म्हणणं मांडण्याचं सांगण्यात आले आहे.
PM Modi Speech । नरेंद्र मोदी यांनी मागितली प्रभू श्री रामांची माफी; भावुक होत म्हणाले…
सुप्रीम कोर्टात या प्रकरणातील पुढील सुनावणी १५ दिवसांनी होईल. निश्चित तारीख अजून जाहीर करण्यात आली नाही. मात्र पंधरा दिवसांनी सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.