Site icon e लोकहित | Marathi News

Maharashtra Politics । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! 10 जानेवारीला ठरणार एकनाथ शिंदे राहणार की जाणार? सुप्रीम कोर्टाने दिले ‘हे’ आदेश

Shiv Sena Mla Disqualification Case Supreme Court Extend 10 Days

Maharashtra Politics । नवी दिल्ली : फक्त महाराष्ट्रचं नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष सत्ता संघर्षाच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षात (Shivsena) बंडखोरी केली. त्यांच्या नेतृत्त्वात 39 शिवसेनेच्या आमदारांनी पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आव्हान देत बंडाचे निशाण फडकवले. अजूनही यावर निकाल आला नाही. (Latest marathi news)

Sunny Deol Viral Video । व्हायरल व्हिडिओवर सनी देओलने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, “जर मला दारू प्यावी लागली तर…”

दरम्यान, या निकालाचा परिणाम देशातील राजकारणावर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला आहे. परंतु अजूनही यावर नार्वेकर यांनी कोणताही निकाल दिला नाही. न्यायालयाने नार्वेकरांना 31 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. दोन्ही बाजूने जवळपास युक्तिवाद पूर्ण झाला असून सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. अशातच नार्वेकर यांनी पुन्हा सुप्रीम कोर्टात तीन आठवड्यांची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी केली. (Shiv Sena Mla Disqualification Case)

Nitesh Rane । मोठी बातमी! नितेश राणेंना मुस्लिम समाजाविरोधी ‘ते’ वक्तव्य भोवणार? राष्ट्रवादीकडून कारवाईची मागणी

परंतु न्यायालयाने 10 दिवसांची मुदतवाढ नक्की दिली. त्यामुळे राहुल नार्वेकर यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आगामी 10 जानेवारीला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर कायम राहणार की त्यांचं पद धोक्यात येणार? हे समजेल. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Shreyas Talpade । हार्ट अटॅक आल्यानंतर श्रेयस तळपदेच्या पत्नीची हात जोडून विनंती, म्हणाली, “माझ्या पतीच्या..”

Spread the love
Exit mobile version