Car Accident । शिवसेनेच्या आमदाराच्या गाडीची दुचाकीला धडक; उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू, ड्रायव्हरवर गुन्हा दाखल

Car Accident

Car Accident । अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. महेंद्र दळवी यांच्या गाडीला दुचाकीस्वाराने धडक दिली. (Mahendra Dalvi Car Accident) ही धडक इतकी जोरात होती की यात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. (Latest maarthi news)

Baramati Lok Sabha । बारामतीत रंगणार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार सामना! भाजपच्या बड्या नेत्याने केली मोठी घोषणा

उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू झाला आहे. जासीम अब्दुल रहेमान पासवारे असे या युवकाचे नाव आहे. दळवी यांच्या कारचा चालक धनेश सणकर याच्या विरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. आमदार दळवी हे शनिवारी मुरुड- नांदगाव येथील साळाव आगरदांडा रस्त्याच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी हा अपघात घडला.

IPL 2024 । आयपीएल सुरु होण्यापूर्वीच ‘या’ टीमला मोठा धक्का! क्रिकेटपटूचा झाला भीषण बाईक अपघात

तर सुदैवाने या अपघातामध्ये दळवी यांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात दळवी यांच्या गाडीच्या एअर बॅगही उघडल्या गेल्या. ही धडक खूप जोरात होती. अपघातात दळवी यांच्या कारच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Uddhav Thackeray । “…तर आम्ही तुमच्यासोबत येऊ”, लोकसभेपूर्वी उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Spread the love