
मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवसेना नेमकी उद्धव ठाकरेंची का शिंदे गटाची? यावरून वाद सुरू होता. दरम्यान निवडणूक आयोगाने शिवसेनेचे (shivsena) धनुष्यबाण हे चिन्ह (symbol) तात्पुरते गोठवण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्याच्या राजकारणात (politics) मोठा भूकंप आलाय. दरम्यान यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी शरद पवार म्हणाले की,”शिवसेनेचे चिन्ह गोठविल्याचे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. कारण हे होणार याची मला खात्री होती. तसेच हल्ली निर्णय कोण घेते, याची मला माहिती नाही. पण एवढं नक्की की निर्णय हे गुणवत्तेवर घेतले जातील, याची खात्री हल्ली देता येत नाही.
ऐन दिवाळीच्या तोंडावर ‘इतक्या’ रुपयांनी वाढल्या डाळींच्या किंमती, खाद्यतेलाचे दरही उंचावले
चिन्ह नसल्याने काही फरक पडत नसतो, मी स्वतः पाच चिन्हांवर निवडणूक लढलो. शिवसेना संपणार नाही, तर अधिक वेगाने वाढेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविल्यानंतर भूमिका मांडताना पवार म्हणाले, ‘‘असे घडेल असे माझे मन सांगत होते. कोणताही पक्ष, बलशाली संघटना असली तरी चिन्ह शेवटपर्यंत टिकेल, असे सांगता येणार नाही. त्यामुळे चिन्ह असो वा नसो निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. शिवसेनेही नवीन चिन्ह घ्यावे आणि निवडणूक लढवावी’’.
दोन्ही गटाला शिवसेना नाव वापरता येते. मात्र यात कंसात गटाचे नाव लिहावे लागणार आहे, असे निवडणूक आयोग सांगतो. यावर पवार म्हणाले, याबाबत उद्धव ठाकरे ठरवतील. कदाचित शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) असे होऊ शकते. काँग्रेसमध्येही दोन गट पडले होते. त्यात एक इंदिरा काँग्रेस आणि दुसरा एस काँग्रेस होता,अशी आठवणही त्यांनी सांगितली. पाच चिन्हांवर लढवली निवडणूक चिन्ह गोठविण्याचा प्रकार सर्वच पक्षांबाबत होऊ शकते का, यावर पवार यांनी स्वानुभव सांगितला.
Suicide : शेतकरी कुटुंबातील जोडप्याची गळफास घेऊन आत्महत्या
पुढे शरद पवार म्हणाले की, चिन्ह महत्त्वाचे नाही तर लोकांचे मत महत्त्वाचे असते. कारण मी पहिली निवडणूक लढलो ती बैलजोडी चिन्हावर, दुसरी गाय वासरू, तिसरी चरखा, चौथी निवडणूक पंजा आणि आता घड्याळ.मी वेगवेगळ्या पाच चिन्हांवर निवडणूक लढवली आणि यशस्वी देखील झालो. तसेच पुढे पवार म्हणाले की, शिवसेना संपणार नाही. ती अजून जोमाने वाढेल. तरुण पिढी जिद्दीने पुढे येईल आणि शिवसेनेची शक्ती वाढेल. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना कायम एकत्र राहील अस देखील शरद पवार म्हणाले.