
मुंबई : काल संपूर्ण देशात बाप्पा गणेशाचं आगमन धूमधडाक्यात झाले. सगळ्यांच्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना करून पूजा अर्चा करण्यात आली. तसेच सगळ्याच क्षेत्रांतून गणेशोस्तवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शिवसेनेनेही बाप्पा गणरायाकडे प्रार्थना केली आहे. आणि याच प्रार्थनेतून शिवसेनेने (shivsena) केंद्र सरकारला जोरदार टोला लगावला आहे.हे गणराया तू सुखकर्ता आणि विघ्नहर्ता आहेस. लोकशाही आणि घटनेने बहाल केलेले ‘मुक्त आणि निर्भय वातावरण’ सत्तेची भूक असलेल्या लोकांच्या तावडीत सापडले आहे. त्यामुळे देशातील मुक्त वातावरण गुदमरले आहे. गणराया, देश ‘निर्भय’ कर, एवढीच प्रार्थना आज देशातील जनता तुला करीत आहे तिचा स्वीकार कर, असा टोला शिवसेनेने लगावलाय.
देशातील वातावरण खरोखरच ‘मोकळे?
शिवसेनेने दैनिक ‘सामना’तून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्यातील आणि देशातील सत्ताधारी हिंदू सण निबंधनपासून मोकळे केले असल्याचं सरकार सांगत आहे.पण खरच हे देशातील वातावरण खरोखरच ‘मोकळे’ राहिले आहे काय?. राज्या-राज्यांतील बिगर भाजप सरकारला धारेवर धरलय तसेच प्रादेशिक पक्षांचे तर नामोनिशाण संपवून टाकण्याची भाषा केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष करीत आहेत. देशातील लोकशाही, स्वातंत्र्य, उच्च संसदीय परंपरा, घटनात्मक अधिकार, धार्मिक एकोपा, संविधानाची चौकट, राजकीय विरोधक अशा सर्वांचेच श्वास’ सरकारी दडपशाहीमुळे कोंडले गेले आहेत.
कमाई पेक्षा महागाई जास्त
नवीन रोजगार राहिला बाजूला पण आहे तोच रोजगारदेखील हातून चाललाय. ‘कमाई आणि महागाई’ यामध्ये समतोल राखता राखता जीव कासावीस होत आहे. अन्नधान्यापासून कडधान्यापर्यंत, स्वयंपाकाच्या गॅसपासून भाजीपाल्यापासून फळांपर्यंत, पेट्रोल-डिझेलपासून दुधापर्यंत प्रत्येक गोष्टीचे भाव दररोज नवीन उंची गाठत आहेत. याचाच एक उदाहरण पाहिलं तर मुंबईत तर सुटे दूध 1 सप्टेंबरपासून तब्बल 7 रुपयांनी महागणार आहे.
भक्तिभावापेक्षा राजकीय भावच जास्त
गणरायाच्या आगमनानंतर आता गौरीच्या स्वागताचीही देशात तयारी धूमधडाक्यात सुरू झाली आहे.बाजारपेठा फुलल्या आहेत.पुढील दहा दिवस वातावरण श्रद्धेने भारलेले असणार आहे. हे सर्व राज्य सरकारने गणेशोत्सव ‘बंधमुक्त केल्याने घडत आहे, अशी अस म्हणत त्यात भक्तिभावापेक्षा राजकीय भावच जास्त आहे,.हे राजकीय भाव गणेशभक्तही ओळखून आहेत, असा शिवसेनेने सरकारवर लगावला आहे.