
मुंबई : दादरमध्ये (Dadar) शनिवारी मध्यरात्री शिवसेना विरुद्ध शिंदे गट यांच्यात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान स्वागत कक्षावरुन राडा झाला. दरम्यान या राड्यात शिवसैनिकांनी शिंदे गटाचे (shinde group) कार्यकर्ते संतोष तेलवणे यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच या राड्यावेळी शिवसेनेच्या सुनील शिंदे (Sunil Shinde) यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
Shinde-Fadnavis: ओबीसी शिष्यवृत्ती बंद! शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
सुनील शिंदे यांनी सदा सरवणकर यांनी दादर पोलीस स्टेशनच्या आवारात गोळीबार केला, असा आरोप केलाय. तर सदा सरवणकर यांनी आपल्यावर करण्यात आलेला आरोप फेटाळून लावला आहे. शिंदे गटाला सत्तेचा माज आला असल्याचं म्हणत सुनील शिंदे यांनी हल्लाबोल केला आहे. तसेच सुनील शिंदे यांनी गोळीबारातून एक पोलीस जखमी होता होता थोडक्यात वाचला, असंही म्हटलंय. दरम्यान, या संपूर्ण राड्यावेळी झालेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज देखील केला होता.
Varun Sardesai: “उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील या भीतीने भाजपाने शिवसेना फोडली” – वरूण सरदेसाई
दादरमध्ये झालेल्या या राड्याचे व्हिडीओही सोशल मीडियात पोस्ट करण्यात आले होते.शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट केली.या पोस्टमध्ये त्यांनी ‘आवाज करणार…तर…ठोकणारच…आज पेग्विन सेनेला…स्वतःची लायकी समजलीच असेल..’ असं म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवाय त्यांनी गोळीबाराचा आरोपदेखील फेटाळून लावला आहे.