
मुंबई : अंबरनाथमधील चिंचपाडा परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंगळवारी (30ऑगस्ट रोजी ) सायंकाळी चिंचपाडा परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवाचा बॅनर फाडला. बॅनर फाडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. दरम्यान बॅनर फाडल्याप्रकरणी शिवसेनेच्या कार्यकर्त्याविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. विकास सोमेश्वर अस या शिवसैनिकाच नाव आहे.
नेमक प्रकरण काय आहे ?
अंबरनाथमधील चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या विकास सोमेश्वर या शिवसैनिकाने याच परिसरात एका मंडळाने लावलेला बॅनर काढला. आणि त्या बॅनरला लाथ मारत तो बॅनर फाडला. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्या नंतर परिसरातील नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. विकास सोमेश्वर याच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी अंबरनाथ मधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये गर्दी केली होती.
जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनच्या बाहेर जाणार नाही अशी ठाम भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली.दरम्यान बॅनर फडल्या प्रकरणी विकास सोमेश्वर याच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करताच विकास सोमेश्वर याला पोलिसांनी अटक केली आहे.पोलीस ठाण्याच्या बाहेर वातावरण तपल्याने हा जमाव हटवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.