Shiv Thackeray । शिव ठाकरेनं जुहू बीचवर केली साफसफाई, पाहा व्हिडीओ व्हिडीओ

Shiv Thackeray Viral Video

Shiv Thackeray । मुंबई : बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. तो त्याच्या कृतींमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत असतो. कधी कधी फॅन सोबत गप्पा मारणे किंवा अन्य काही गोष्टींमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. त्याने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे, सध्या तो खतरो के खिलाडी १३ मध्ये पाहायला मिळत आहे. शिव ठाकरेचे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ कायम व्हायरल होत असतात. सध्या देखील सोशल मीडियावर शिवचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. (Shiv Thackeray)

Asia Cup 2023 । आशिया चषकापूर्वीच संघाला मोठा धक्का! वेगवान गोलंदाज बाहेर

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शिव ठाकरे जुहू बीच वर जाऊन साफसफाई करताना दिसत आहे. यामुळे त्याचे सगळीकडे कौतुक देखील केले जात आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या पेजवर हा शिवचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये शिव बीच वरील कचरा वेचताना दिसत आहे. त्याचबरोबर शिव ठाकरे ने देखील त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शन लिहिले आहे की. “आपण एकत्र मिळून बदलू शकत” असं त्याने लिहिल आहे.

सातबारा उताऱ्यातील चूक दुरुस्त करायचीय? फॉलो करा ही सोपी पद्धत, घरबसल्या मिनिटात होईल काम

सध्या शिवचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यावर कमेंट करत एका नेटकऱ्याने यांनी लिहिले की, शिव खूप चांगलं काम करतोय तर दुसऱ्या नेटकरेन लिहिलं की, खूप छान अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहेत.

Chandrayaan 3 Live Streaming । चांद्रयान-3 लँडिंग किती वाजता होईल? ‘या’ ठिकाणी पाहता येणार थेट प्रक्षेपण

दरम्यान, सोशल मीडियावर सतत चर्चेत असलेला शिव याने त्याच्या करिअरची सुरुवात ‘रोडिज’ या रिअ‍ॅलिटी शोपासून केली आहे. त्यानंतर तो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वत झळकला आणि विजेता देखील ठरला. त्यानंतर तो सातत्याने चर्चेत राहिला त्याने हिंदी बिग बॉस 16 मध्ये प्रवेश केला आणि सध्या तो देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे.

Rashmi Shukla । फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा!

Spread the love