शिव ठाकरे खतरोंके खिलाडी मध्ये दिसणार; सरावसुद्धा केला सुरू

Shiv Thackeray will appear in Khatronke Khiladi; Practice also started

बिग बॉस मुळे आजपर्यंत अनेक कलाकारांना मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. शिव ठाकरे (Shiv Thackeray) हा यातीलच एक कलाकार आहे. रोडीज, बिग बॉस मराठी व बिग बॉस हिंदी यामुळे शिव घराघरांत पोहोचला असून त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. दरम्यान लवकरच शिव ठाकरे रोहित शेट्टीच्या ‘खतरोंके खिलाडी’ या शो मध्ये दिसणार आहे. (Khatronke Khiladi) त्यासाठी त्याने जय्यत तयारी देखील सुरू केली आहे.

मराठा आरक्षणासाठी नवीन आयोग स्थापन करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये शिव ठाकरेला ‘खतरोंके खिलाडी’ या शो बद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्याने त्याच्या तयारी बद्दल सांगितले आहे. तुझी खतरोंके खिलाडीसाठी कशी तयारी सुरू आहे ? असे मुलाखती दरम्यान विचारताच शिव म्हणाला की, “खतरों के खिलाडी या शोसाठी माझी अगदी छान तयारी सुरु आहे. यासाठी मी प्रचंड मेहनत घेतोय. मी नेहमीच माझ्या क्षमतेपेक्षा जास्त गोष्टी करत असतो.”

प्रवाशांनी गच्च भरलेली बस, घाटातच तुटला एक्सलेटर अन् व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा!

शिव ठाकरेला आगीची भीती वाटत नाही. परंतु, त्याला पाण्याची भीती वाटते. म्हणून मी आता स्विमिंग शिकत आहे. त्यासोबतच तो आणखी काही गोष्टींचा सराव सुद्धा करत आहे. अशी माहिती शिवने या मुलाखतीमध्ये दिली आहे. बिग बॉस हिंदी मध्ये शिव ठाकरे टॉप ५ स्पर्धकांमध्ये होता.

अजित पवार यांना मोठा धक्का! राष्ट्रवादीच्या ‘या’ महत्वाच्या यादीतून वगळण्यात आले नाव

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *