दिल्ली : आज भारतीय नौदलाने देशाच्या पहिल्या घरगुती विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतच्या लाँचिंगच्या वेळी
नौदलाने आपल्या नवीन चिन्हांचे अनावरण केले आहे. भारतीय नौदलाच्या या नवीन चिन्हातील अष्टकोनी आकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेने प्रेरित आहे. आजपर्यंत भारतीय नौदलाच्या ध्वजावर लाल रंगाचे सेंट जॉर्ज क्रॉस जोडलेले होते. जे की गुलामगिरीचे चिन्ह होते, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने बदलले गेले आहे,” असे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Shrikant Shinde: श्रीकांत शिंदे युवासेनेचे अध्यक्ष होणार; शिंदे समर्थकांनी पोस्टर केले व्हायरल
काय आहे या चिन्हाचा अर्थ?
या नवीन चिन्हावर वरच्या बाजूला राष्ट्रध्वज आहे. राष्ट्रीय चिन्हासह निळा अष्टकोनी आकार एका अँकरच्या वर बसलेला आहे, जो नौदलाच्या बोधवाक्य असलेल्या ढालीवर उभा आहे. या चिन्हातील निळा अष्टकोनी आकार भारतीय नौदलाच्या बहुदिशात्मक पोहोच आणि बहुआयामी ऑपरेशनल क्षमतेचे प्रतीक असलेल्या आठ दिशांचे प्रतिनिधित्व करतो. अँकर चिन्ह हे “स्थिरता” दर्शवते, मराठा राज्याचे संस्थापक तथा भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान करण्यासाठी हे नवीन चिन्ह तयार करण्यात आले आहे. असे नौदलाने सांगितले.
Nitin Gadkari: गडकरींनी दिला ट्रॅफिकच्या समस्येवर रामबाण उपाय, पुण्यात आणणार उडत्या बसेसची योजना
ज्यांच्या दूरदर्शी सागरी दृष्टीकोनामुळे एक विश्वासार्ह नौदल ताफा स्थापित झाला,”अश्या महान भारतीय सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रे पासुन प्रेरणा घेऊन आम्ही हे चिन्ह बनवले आहे. असे नौदलाने नवीन चिन्हाचे प्रदर्शन करताना व्हिडिओमध्ये म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताफ्यात “60 लढाऊ जहाजे आणि अंदाजे 5,000 सैनिकांचा समावेश होता. शिवाजी महाराजांच्या काळात वाढणारी मराठा नौदल शक्ती बाह्य आक्रमणाविरूद्ध किनारपट्टी सुरक्षित करणारी पहिली होती,” असेही नौदलाने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.