Site icon e लोकहित | Marathi News

Sanjay Raut : “शिवडी न्यायालयाचे आर्थर रॉड कारागृहाला आदेश”, संजय राऊतांना दुपारी १२ वाजता हजर करा

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या अटकेत आहेत. दुपारी १२ वाजता दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून हजर करण्याचे आदेश शिवडी न्यायालयाचे आर्थर रॉड कारागृहाला गुरुवारी देण्यात आले आहेत.

संजय राऊत अटकेमध्ये असल्यामुळे त्यांना मेधा सोमय्या (Medha Somayya) यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयत हजर राहता आले नाही. यामुळे त्यांना जबाब नोंदवण्यासाठी हजर करण्याचे आदेश ईडीने द्यावेत अशी मागणी मेधा सोमय्या यांनी न्यायालयाकडे केली होती.

याच पार्शवभूमीवर संजय राऊत यांना दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून दुपारी १२ वाजता न्यायालयामध्ये हजर करण्याचे आदेश आर्थर रॉड कारागृह प्रशासनाला देण्यात आले आहेत. शौचालय घोटाळ्याच्या प्रकरणाचा आरोप राऊतांनी सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून मेधा यांनी राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा केला आहे.

Spread the love
Exit mobile version