Maharashtra politics । मोठी बातमी! लोकसभेच्या जागा वाटपाआधी शिंदे गटाचा बडा नेता अजित पवार गटात होणार सामील?

Maharashtra politics

Maharashtra politics । राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election 2024) पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. महायुतीमध्ये जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरु असून मित्र पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच आता लोकसभेच्या (Loksabha election) जागा वाटपाआधी शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Latest marathi news)

Maharashtra Budget । अजित पवारांनी सादर केला अंतरिम अर्थसंकल्प, केल्या अनेक महत्त्वपूर्ण घोषणा

शिरूरचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) अजित पवार गटात (Ajit Pawar Group) सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अतीतातडीची बैठक बोलवली असून या बैठकीत ते मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जर त्यांनी अजित पवार गटात सहभागी निर्णय घेतला तर शिंदे गटाच्या अडचणी वाढतील.

Dhangar Reservation । मोठी बातमी! पिवळं वादळ धडकणार राजधानीत, १००० गाड्यांचा ताफा घेऊन धनगर समाज मुंबईच्या दिशेने रवाना

दरम्यान, आढळराव पाटील यांना लोकसभा निवडणूक लढण्याची खूप इच्छा असल्याने जर गरज पडली तर ते राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्याची शक्यता आहे. याच संदर्भात 29 फेब्रुवारीला आढळराव पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडीमध्ये शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, पक्ष अंगीकृत संघटना आणि सर्व शिवसैनिकांची अतितातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते महत्वाचा निर्णय घेतील.

Manoj Jarange । ‘जरांगे पाटलांना अटक करून …… ‘, भाजपने केली मोठी मागणी

Spread the love