आज १९ फेब्रुवारी म्हणजे शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांचा जन्म दिवस. आज देशभरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) शिवजयंती साजरी केली जाते आहे. शिवप्रेमींसाठी हा दिवस तर खूप खास असतो. अगदी छोट्या मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत शिवजयंती साजरी केली जाते आहे. मनोरंजन विश्वातील कलाकार देखील शिवजयंती उत्साहात साजरी करत आहे. नुकतीच बालकलाकार मायरा वायकुळने शिवजयंती निमित्त फोटो शेअर केले आहेत.
शरद पवार यांनी ग्रामीण भागातील डॉक्टरांना दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला!
झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने पात्रांनी कमी वेळात प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. या मालिकेतील छोट्या परीचे पात्र साकारणारी बालकलाकार मायरा वायकुळ (myra vaikul) हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. तिचे फॅन्स फॉलोवर्स प्रचंड आहेत. मायरा सोशल मीडिया (Social Media) स्टार आहे हे सर्वांना माहित आहे.
मायरा सोशल मीडियावर सक्रिय असते. ती लहान असली तरी तिचे आईवडील सोशल मीडियावरुन तिचे अपडेट देत असतात. मायराने शिवजयंती निमित्त फोटोशूट केले आहे. जे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये नऊवारी साडी, डोक्यावर फेटा, नाकात नथ आणि हातात शिवरायांची मूर्ती घेऊन चिमुकल्या परीने हे खास फोटोशूट केलं आहे.
उद्धव ठाकरेंसमोरील अडचणी वाढल्या; मशाल चिन्ह सुद्धा हातातून निसटण्या