Loksabha Elections । बारामती : संपूर्ण राज्याचे लक्ष यंदा बारामती मतदारसंघाकडे (Baramati Constituency) लागले आहे. कारण पहिल्यांदाच या मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. अटीतटीच्या लढतीत यंदा कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. नुकतीच बारामतीत महायुतीची प्रचार सभा पार पडली. या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) एकाच व्यासपीठावर होते. (Latest marathi news)
Samruddhi Highway Accident । समृद्धी महामार्गावर ट्रक-आयशरचा भयानक अपघात, १ जण जागीच ठार तर ३ जखमी
काहीच दिवसांपूर्वी विजय शिवतारे हे अजित पवार यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. पण त्यानंतर शिवतारेंनी माघार घेतली. या सभेदरम्यान, विजय शिवतारेंनी आपण निवडणुकीतून माघार का घेतली? याच कारण सांगितलं आहे. “मला बोललं जात होतं की आपण काहीतरी केलं पाहिजे. माध्यमे मी जिथे असेल तिथे होता. माझं लॉजिक ठीक होतं. पण आता जाऊ द्या. लोकांना प्रचंड उत्साह होता. अनेक जण माझ्यापाठीशी उभे राहिले. दोनवेळा मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली, पण माझं मन तयार नव्हतं,” असे विजय शिवतारेंनी स्पष्ट केले.
“दादा मुख्यमंत्र्यांशी बोलत होते. कोणत्याही प्रकारे लढायचं. गोष्टी घडत असतात, त्या विसरून जायच्या असतात. मतभेद असतात पण मनभेद नको. आगामी निवडणुकीत घड्याळाला मतदान झालं पाहिजे, सुनेत्रा पवार यांना मतदान म्हणजे मोदींना मतदान. बारामतीच्या विजयाच्या वाट्यामध्ये पुरंदर असेल,” असा विश्वास विजय शिवतारेंनी व्यक्त केला.
Dhairyashil Mohite Patil । भाजपला सर्वात मोठा धक्का! धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला राजीनामा