Shoaib Malik Second Marriage । सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि शोएब मलिक यांच्याविषयी बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती की, दोघेही घटस्फोट घेणार आहेत. मात्र यादरम्यान समोर आलेली बातमी अनेकांसाठी आश्चर्यचकित करणारी आहे. घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिकने लग्न केले आहे. त्याने अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे. सध्या या दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
Mumbai News । धक्कादायक बातमी! बॉयफ्रेंडने गळा घोटत संपवलं गर्लफ्रेंडला
शोएब मलिकने त्याच्या सोशल मीडियावर लग्नामधील काही खास फोटो शेअर केले आहेत. सध्या या फोटोंची सगळीकडे चर्चा रंगली आहे. शोएब मलिकचे अभिनेत्री सना जावेदसोबत फोटो व्हायरल होताच सगळीकडे खळबळ उडाली. आता सानिया मिर्झावर प्रश्न उपस्थित होत असून तिचा पाकिस्तानात लग्न करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे बोलले जात आहे.
NCP MLA disqualification Case । राष्ट्रवादी आमदार प्रकरणात समोर आली सर्वात मोठी अपडेट!
सानिया मिर्झाचे पहिले लग्न
2010 मध्ये शोएब मलिकसोबत लग्न करताना सानिया मिर्झाने एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली होती. दोघांनी हैदराबादमध्ये मुस्लिम रितीरिवाजानुसार लग्न केले. त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. भारतात लग्नानंतर सियालकोटमध्ये वलीमा सोहळा पार पडला. या दोघांना इझान नावाचा मुलगाही आहे. मात्र अचानक शोएब मलिकने लग्न केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Sharad Pawar । अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याचा शरद पवारांनी घेतला समाचार