
मागील काही महिन्यांपासून शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा? यावरून शिंदे व ठाकरे गटात वाद सुरू होते. दरम्यान निवडणूक आयोगाने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून शिवसेना ( Shivsena) पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.
पोलीस भरतीबाबत समोर आली मोठी अपडेट! वाचा सविस्तर
निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरेंकडून शिवसेनेचे नाव आणि पक्षाचे चिन्ह हिसकावण्यात आले आहे. आता यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण ठाकरे गटाला मिळालेले ताप्तुरते मशाल चिन्ह आणि पक्षाचे नाव आता फक्त कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंत आहे. हे नाव त्यांना फक्तं निवडणुकीपर्यंत वापरण्यात येणार असल्याचं निवडणुकीच्या ऑर्डरमध्ये नमूद करण्यात आले आहे.
पोलीस भरतीबाबत समोर आली मोठी अपडेट! वाचा सविस्तर
त्यामुळं ठाकरे गट निवडणूक झाल्यानंतर पुन्हा निवडणूक आयोगात जाणार असून “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” हे पक्षाचे नाव राहावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार आहे.
शिवसेना भवन कोणाचं? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…