दिल्ली : काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागली आहे. कारण एका मागून एक नेते पक्षाला रामराम ठोकात आहेत. मागील दोन दिवसात काँग्रेसचे(congress) जम्मू-काश्मीरमधील नेते गुलाब नबी आझाद (gulab nabi ajhad)यांनी 26 ऑगस्ट रोजी पक्षाला रामराम ठोकला होता.दरम्यान या राजीनाम्याला अवघे ४८ तास उलटले असताना आता पक्षाला अजून एका नेत्याने राजीनामा (resignation) दिला.
यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुलाब नबी आझाद यांनी सोनिया गांधींना चारपानी पत्र लिहीत राजीनामा दिलता.तर या नेत्याने राहुल (Rahul Gandhi) गांधींच्या नेतृत्वावर टीका करत पक्षाला रामराम ठोकला.हा नेता तेलंगणामधील काँग्रेसचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते एम. ए. खान (M.A.Khan)आहेत.राहुल गांधींमुळेच काँग्रेसमधली परिस्थिती बिघडल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
“मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. राहुल गांधींनी पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा कारभार सांभाळल्यापासून इथली परिस्थिती अधिकच ढासळत आहे. राहुल गांधींची वेगळीच विचारसरणी असून ती पक्षाच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांनी जुळत नाही ”, असा घणाघात खान एम. ए. खान यांनी केला आहे.
“काय ते मंत्री..काय त्यांचे नाव..काय त्यांचा दौरा “,अमोल मिटकरींचा तानाजी सावंतांवर घणाघात
पुढे खान म्हणाले की, “ज्येष्ठांशी कसं वागायचं, हे राहुल गांधींना माहिती नाही. राहुल गांधींच्या या धोरणांमुळे काँग्रेसची वाताहत झाली आहे.त्यामुळे जिथं राहूल यांची विचारसरणी गेली तिथं अनेक दशकं पक्ष उभारणीचं काम केलेले ज्येष्ठ नेतेच पक्षाला सोडून जात आहेत. ”, असं एम. ए. खान म्हणाले आहेत.
बीएड – डिएडधारकांसाठी खुशखबर! नोव्हेंबरमध्ये पुन्हा होणार टीईटी परीक्षा