शुक्रवारपासून भारत आणि न्यूझीलंड (India and NewZealand) यांच्यात तीन सामन्याच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. यामध्ये टीम इंडियासाठी एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. संघाचा एक युवा खेळाडू दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
पठाण चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी रुपये
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुखापत झाल्यामुळे ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) टी 20 मालिका खेळू शकणार नाही. त्याला उपचारासाठी बेंगलोर येथील एनसीएमध्ये पाठवण्यात आलेय. बीसीसीआयने याबाबत आजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
रँगिगला कंटाळून ITI च्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या
न्यूझीलंड आणि टीम इंडिया यांच्यामध्ये शुक्रवारी रांची या ठिकाणी पहिला टी 20 सामना होणार आहे. त्याआधीच ऋतुराजला दुखापत झाली आहे. त्याच्या मनगटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो तीन सामन्याच्या टी 20 मालिकेतून बाहेर गेला आहे.
सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लागली १ कोटींची लॉटरी; गावाने काढली जंगी मिरवणूक