सध्या उत्तराखंडमधून (Uttarakhand) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तराखंडमध्ये एक गाडी दरीत कोसळून 12 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तराखंडमधील जोशीमठ (Joshimath) या ठिकाणी घडली आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नुकसानग्रस्तांसाठी राज्यसरकारने मंजूर केला कोटींचा निधी
मिळविलेल्या माहितीनुसार, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असावा. या अपघातामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. आता नक्की अपघात कसा घडला याची चौकशी पोलीस यंत्रणा (Police system) करत आहे.
भूक कंट्रोल न झाल्याने हत्तीने खाल्ले चक्क…; पाहा व्हिडीओ
या घटनेबाबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Chief Minister Pushkar Singh Dhami) यांनी शोक व्यक्त केला आहे. यातून सर्वांचा बचाव करण्याचे प्रयत्न करावेत असे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत.
संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा; महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता