औरंगाबाद: कालपासून नवरात्रउत्सव चालू झालेला आहे. कोरोना महामारीनंतर हा पहिलाच नवरात्र उत्सव असल्याने लोक खूप जल्लोषात हा उत्सव साजरा करत आहेत. पण आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त खरेदी केलेल्या भगर आणि भगरीचें पिठातून विषबाधा झाल्याची घटना औरंगाबादसह जालना जिल्ह्यात समोर आलीये. विषबाधा झालेल्या व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय! लवकरच राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरणार
औरंगाबादच्या लासूर स्टेशन भागातील एकाच वेळी 13 जणांना ही विषबाधा झाल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. तर जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील 24 जणांना विषबाधा झालीये. औरंगाबादच्या लासूर स्टेशन येथील गावकर्यांनीगावातून भगर व भगरीचे पीठ खरेदी केले होते. पण हे खाताच 13 ग्रामस्थांना विषबाधा झाली माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या घटनेवर प्रतिक्रिया देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर म्हणाले, अन्नबाधा झालेल्यांची व्यक्तींची प्रकृती आता स्थिर आहे. मात्र या प्रकरणाबाबत अन्न व औषधी प्रशासन विभागास तपासणी करण्याबाबत सूचना करण्यात येईल.
व्हायरल व्हिडीओने फेमस झालेल्या अहमदनगरच्या शाळकरी मुलाला अजय-अतुलने दिली चित्रपटात गाण्याची संधी