शॉटसर्किटमुळे अनेक धक्कादायक घटना घडलेल्या आपण पाहतच असतो. यामध्ये आता अशीच एक घटना बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे. शॉर्टसर्किट होऊन आग लागून गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या आगीत जवळपास ३० जण होरपळले असून १० जण गंभीर जखमी झाले आहेत.
अभिनेत्री अमृता सुभाष ४३ व्या वर्षी होणार आई?, इन्स्टाग्राम पोस्टने वेधल सर्वांचं लक्ष
सूत्रांच्या माहितीनुसार, घटना अशी घडली की, शॉर्टसर्किट झाल्यामुळे भीषण आग लागली. आणि त्यानंतर या आगीमध्ये गॅस सिलिंडरचाही स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीमध्ये ३० जण होरपळले असून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. आगीमध्ये अडकणाऱ्या नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे ७ पोलीस देखील जखमी झाले आहेत.
कोंबड्याच्या ऐवजी कुर्बानी देणाऱ्याचाच गेला बळी, वाचा संपूर्ण घटना
आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आग वीजवण्यात आली. या आगीमध्ये जखमी झालेल्या लोकांवर रुग्णालयात उपचार चालू आहे. आता या प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.
माणुसकीला काळीमा फासणारी घटना, गायीच्या तोंडात फोडला फटका; जबडाच झाला उद्ध्वस्तच