
मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) नुकतीच इर्शाळवाडी (Irshalwadi) या गावावर दुर्दैवी घटना घडली. या दुर्दैवी घटनेत एकूण २६ जणांना हकनाक बळी गेला. तर अजूनही अनेकांचा शोध लागला नाही. अखेर ४ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर या ठिकाणी शोधकार्ये थांबवले आहे. एका रात्रीतच हे गाव गायब झाले आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi news)
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या कसलीच सुविधा नाही. ना येथे मोबाइलची सुविधा आहे ना येथे दळणवळणाची कोणती साधने आहेत. असे असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाचून तुमच्याही पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. राज्यात इर्शाळवाडीसारखी अशी 3500 गावे आहेत. जी संपर्क क्षेत्राबाहेर आहेत, याबाबतची दूरसंचार विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.
“दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा भाजपने स्वतःचा पक्ष बांधावा”, मनसेने दिला भाजपला सल्ला
या गावांमध्ये कोकण (Kokan) आणि नक्षलग्रस्त आदिवासी भागातील गावांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. एकीकडे राज्यात हळूहळू 5G सुविधा (5G Service) सुरु होत आहे तर दुसरीकडे या गावात कसलीच सुविधा नाही त्यामुळे आतातरी या गावात या सुविधा सुरु कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Buldhana Accident News । ब्रेकिंग! घाटात बस पलटी झाली, शाळकरी मुलांचा मोठा आक्रोश