
बारामती (Baramati) मध्ये प्रतिबंधीत अन्न भेसळयुक्त पदार्थांच्या (Food and adulterated substances) संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याठिकाणी पोलिसांनी तब्बल ३८ लाखांचे प्रतिबंधीत अन्न भेसळयुक्त पदार्थ जप्त केले आहेत. बारामती तालुक्यातील चौधरी वस्तीजवळ असलेल्या गोदमातून हा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी बारामती मधील तीन जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सर्वात मोठी बातमी! शूटिंगदरम्यान सलमान खान गंभीर जखमी
आरोपी नारायण रमेश पिसाळ यांनी कर्नाटक मधून हिरा पानमसाला, रॉयल सेंटेड 717 तंबाखु हा माल आणला. या मालाची एकूण किंमत ३८ लाख रुपये इतकी आहे. नारायण पिसाळ यांनी शरद सोनवणे यांच्या सांगण्यावरून हा माल आणला होता. त्यांनतर या मालाचा टेम्पो प्रशांत गांधी यांच्या गोदामात आणून ठेवला होता.
Samsung ची धमाकेदार ऑफर १ लाख रुपयांचा फोन फक्त २२ हजारांना, पाहा भन्नाट ऑफर
मानवी जीवितास धोका उत्पन्न होईल अशा पदार्थांची वाहतूक व विक्रीचा उद्देश लक्षात घेता पोलिसांनी या तिघांवर कारवाई केली आहे. भा.दं.वि 1860 चे कलम 328, 188, 272,273, अन्न सुरक्षा मानके अधिनियमाच्या कलमान्वये यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी अभिजित एकशिंगे यांनी याबाबत फिर्याद दिली होती. या प्रकरणात आणखी आरोपी सहभागी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.