Cows Died । गाईच्या दुधाला यंदा चांगला हमीभाव (Milk Price) मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी गो पालन व्यवसाय करत आहेत. या व्यवसायातून अनेक शेतकरी लखपती झाल्याचेही आपण पाहिले असेलच. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे जनावरांना मुबलक प्रमाणात चारा मिळत आहे. परंतु विषारी चारा (Poisonous fodder) खाल्ल्याने ४ गायींचा तडफडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Latest Marathi News)
Rahul Gandhi | हा लढा भाजपच्या विचारसरणीविरुद्ध, राहुल गांधी यांचा भाजपवर निशाणा
ही घटना कोल्हापूर *Kolhapur) जिल्ह्यातील कागल तालुक्यामधील आहे. या तालुक्यातील साके या गावात काही अज्ञातांनी तानाजी सातापा गवसे यांच्या शेतात असणाऱ्या वैरणीवर विषारी औषध फवारले होते. याची कसलीच माहिती या शेतकऱ्याला नव्हती. त्याने नेहमीप्रमाणे आपल्या गायींना हा चारा खाऊ घातला. परंतु त्यावर विषारी औषध असल्याने गायींचा जागीच तडफडून मृत्यू झाला आहे.
Cricket | क्रिकेट प्रेमींसाठी समोर आली आनंददायक बातमी
सध्या राज्यात दुधाचे दर वाढले आहेत तर दुसरीकडे गायींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने साके गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या गवसे कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे एकूण अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेला जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
अदानी समूहाची बदनामी करण्यासाठी हिंडनबर्गने चुकीचा रिपोर्ट दिला, गौतम अदानींचा गंभीर आरोप
दरम्यान, यापूर्वीही या गावात अशीच काहीशी घटना घडली होती. अज्ञात व्यक्तींकडून एका शेतकऱ्याच्या वीस गुंठ्यातील झेंडूफूल शेतीवर विषारी औषध फवारले होते. त्यामुळे बाग करपून गेली होती. ही घटना ताजी असतानाच वैरणीवर विषारी औषध फवारले आहे.
Uddhav Thackeray । विधिमंडळातलं चित्र बदलणार?, उद्धव ठाकरेंना अजून एक मोठा धक्का बसणार?
हे ही पहा