सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील चिंदर (Chinder) येथे अवघ्या तीनच दिवसात ३१ शेतकऱ्यांच्या एकूण ४१ जनावरांचा मृत्यू विषबाधेमुळे मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. सध्या राज्यात खरीप हंगाम सुरू आहे, अशातच जनावरांचा मृत्यू झाल्याने शेतकरीवर्गातून मदतीची मागणी केली जात आहे. दरम्यान, जनावरांना चाऱ्यातून विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज पशुसंवर्धन विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. (Latest Marathi News)
“जर टोमॅटो खाल्ला नाही तर सुनील शेट्टी काही मरणार नाही”, रविकांत तुपकर चांगलेच संतापले
जनावरांना अचानक त्रास होऊ लागल्याने सलग तीन दिवसात ४१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. डोळ्यांदेखत जनावरांना मरताना पाहून शेतकरीवर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाला (Department of Animal Husbandry) याची माहिती दिली. त्यानंतर पशुसवर्धंन सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे, जिल्हा उपायुक्त डॉ. अतुल डांगोरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई यांनी या परिस्थितीची माहिती घेतली. (41 animals died due to poisoning)
सीमा हैदरला पाकिस्तानला पाठवले नाहीतर २६/११ सारखा हल्ला केला जाईल; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
त्यावेळी जनावरांना चाऱ्यातून सायनाईड विषबाधा झाली असा प्राथमिक अंदाज डॉ. कांबळे यांनी व्यक्त केला आहे. तरीही पुणे प्रयोगशाळेच्या पथकाकडून आवश्यक रक्ताचे नमुने आणि चारा नमुने घेण्यात येणार आहेत.
Ajit Pawar | अजित पवार यांची वंदे भारत ट्रेनमध्येही क्रेझ कायम, कार्यकर्त्यांनी केली प्रचंड गर्दी