Beekeeping Attack । धक्कादायक! मधमाशांच्या हल्ल्यात ५ जणांचा मृत्यू

Shocking! 5 people died in bee attack

Beekeeping Attack । राज्यात यंदा चांगला पाऊस (Heavy Rain) झाला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पेरण्यांची लगबग सुरु झाली आहे. शेतकरीवर्ग बियाणे, खते आणि कीटकनाशक खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे आता शेतकऱ्यांची बियाणे खरेदी करताना फसवणूक होणार नाही. कारण सरकार (Government) आता फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar । शरद पवार ॲक्शन मोडमध्ये! येवल्यातील सभेनंतर आता बीडमध्ये सभा

एकीकडे पेरण्यांची लगबग सुरु आहे तर दुसरीकडे शेतात काम करणाऱ्या शेतकरी आणि मजुरांचा मधमाशी (Beekeeping ) चावल्यामुळे मृत्यू झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव (Goregaon) तालुक्यातील कुऱ्हाडी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत केली जाणार असल्याची माहिती गोरेगावचे तहसीलदार नागपुरे यांनी दिली आहे.

Gadar 2 | प्रदर्शित होण्याअगोदरच ‘गदर 2’चा बंपर धमाका; विकली गेली तब्बल ‘इतकी’ तिकीट

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सध्या भात लावणीचे काम सुरु आहे. हे शेतकरी आणि शेतमजूर सायंकाळी ६ वाजेपर्यंत शेतात भात लावणीचे काम करत होते. हे सर्वजण सायंकाळी काम आवरून घरी चालले असताना त्यांच्यावर अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.

Genelia’s birthday । जिनिलीयाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखने शेअर केली खास पोस्ट; म्हणाला..

परंतु त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच जि.प. सदस्य शैलेश नंदेश्वर आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी जिल्हा प्रशासनाला शासकीय योजनेंतर्गत नुकसान भरपाई देण्याचे आवाहन केले.

पुण्यात फिरायला जात असाल तर नक्की खा ‘हे’ चविष्ट पदार्थ, पाहूनच तोंडाला सुटेल पाणी

Spread the love