Agriculture News । धक्कादायक! साखर कारखानदारांनी थकवले FRP चे 800 कोटी रुपये, होणार कडक कारवाई

Shocking! 800 crores of FRP exhausted by sugar millers, strict action will be taken

Agriculture News । भारतात मोठ्या प्रमाणावर ऊसाचे पीक (Sugarcane crop) घेतले जाते. इतर पिकांप्रमाणे ऊसालादेखील चांगला हमीभाव मिळत नाही. त्यात अनेकदा ऊसाची (Sugarcane) तोडणीदेखील उशिरा केली जाते. इतकेच नाही तर शेतकऱ्यांना ऊसाचे बिलही लवकर मिळत नाही. अशातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली असून साखर कारखानदारांवर (Sugar factory) कारवाई करण्याच्या सूचना साखर आयुक्तांनी दिल्या आहेत. (Latest Marathi News)

Agriculture News । दिलासादायक बातमी! आता 5 गुंठ्यांचीही होणार खरेदी-विक्री, असा करा अर्ज

राज्यभरातील अनेक साखर कारखान्यांकडे ऊसाच्या FRP चे तब्बल 800 कोटी रुपये थकले (FRP) आहेत. त्यांच्यावर आता साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, 2022-23 मध्ये ऊसाच्या गाळप हंगामात शेतकऱ्यांकडून 211 साखर कारखान्यांनी ऊसाची खरेदी केली असून अवघ्या 125 कारखान्यांनी 100 टक्के एफआरपीची रक्कम दिली आहे.

Tomato Price Hike । टोमॅटोने बदलले नशीब! ‘या’ गावातील 12 शेतकरी बनले करोडपती तर 55 लखपती

79 कारखान्यांनी 80 ते 99 टक्के एफआरपीची रक्कम दिली असून दोन कारखान्यांनी 60 ते 80 आणि पाच कारखान्यांनी 50 टक्केचं एफआरपीची रक्कम थकवली आहे. आता त्यापैकी एकूण नऊ कारखान्यांच्या विरोधात साखर आयुक्तालयाकडून महसूल वसुली प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कारखानदारांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे आता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात एफआरपीची रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Prabhas । मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता प्रभास याचं फेसबूक पेज झालं हॅक

हे ही पहा

Spread the love