सध्या संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारात पतंगांची विक्री सुरू झाली आहे. अनेक रंगीबेरंगी पतंगांनी बाजारपेठा सजल्या आहेत. हे पतंग जितके पहायला छान वाटतात तितकेच ते धोकादायक देखील असतात. कारण, पतंगाच्या मांज्याने अनेक धक्कादायक घटना कायम आजूबाजूला घडत असतात. आता अशीच एक धक्कादायक घटना नाशिकमध्ये (Nashik) घडली आहे.
‘महिलांनो दोनच अपत्यावर थांबा, उगाच पलटण वाढवू नका’; अजित पवारांचे वक्तव्य चर्चेत
नायलॉन मांजा (Nylon Manja) गळ्यात अडकल्याने दहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाल्याची धक्कदायक घटना नाशिकमधून समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी (Dindori) तालुक्यातील धामणगाव (Dhamangaon) परिसरात ही धक्कदायक घटना घडली आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे पुन्हा गैरहजर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सूत्रांच्या माहितीनुसार, आरिफा शेख असं या १० वर्षीय चिमुकलीचा नाव आहे. शाळा सुटल्यानंतर चिमुकली तिच्या मामाच्या गाडीवर बसून घरी निघाली होती. याचवेळी पाठीमागे बसलेल्या चिमुकलीचा नायलॉन मांज्यामुळे गळा कापला गेला. गळा कापल्याने ती गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.